अंबाजोगाई (वार्ताहर): येथील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ, अंबाजोगाईच्या वतीने दरवर्षी अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महणीय व्यक्तींना पुरस्कारांने सन्मानित करत असते. यावर्षी श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ आयोजित श्री दासगणु महाराज रचित 'श्री गजानन विजय ग्रंथा'च्या 4 दिवसीय पारायण सोहळा दत्त संस्थान दासोपंत स्वामी धाकटे देवघर येथे आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने 'अध्यात्म सेवा पुरस्कार 2025' ह.भ.प. श्री अंबादास महाराज चिक्षे यांना संत एकनाथ महाराजांचे वंशज ह.भ.प.श्री पुष्कराज महाराज गोसावी,पैठण यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.


0 Comments