चौदाव्या मासिक सभेत ऐनोद्दीन वारसी यांचे बासरी वादन


अंबाजोगाई (वार्ताहर): येथील मातृस्वर संगीत विद्यालय व श्री खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या वतीने 14 वी मासिक सभा आयोजित करण्यात आली आहे. 
 या मासिक सभेत देगलूर येथील पंडित श्री रोणू मुजुमदार यांचे शिष्य श्री ऐनोद्दिन वारसी यांचे बासरी वादन आयोजित करण्यात आले आहे. मागील वर्षभरापासून मिळणाऱ्या रसिकांच्या चांगल्या प्रतिसादामुळेच मासिक सभा सर्व परिचित होत आहे. आपण सर्वांनी दिनांक 27 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वा. स्व. गोपीनाथरावजी मुंडे सभागृह, श्री खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्वांनी या चौदाव्या मासिक संगीत सभेचा लाभ घ्यावा असे आवाहन मासिक सभा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments