भाजपच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त वडगाव येथे उत्साहात कार्यक्रम संपन्न



कोल्हापूर प्रतिनिधी: किशोर जासूद : वडगाव (ता. हातकणंगले) येथे भारतीय जनता पार्टीच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने महाराष्ट्राचे कर्तृत्ववान नेते व लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तसेच भाजपचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांनी सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष मा. श्री. अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मा. श्री. विश्वास माने आप्पा, वडगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मा. श्री. तय्यब कुरेशी, भाजपा उप तालुकाध्यक्ष मा. श्री. धनंजय गोंदकर, मा. श्री. विजुभाई शहा, श्री. तानाजी ढाले, श्री. राजेंद्र जाधव, श्री. संतोष माळी, श्री. राजकुमार मिटारे, श्री. रघुनाथ पिसे, किशोर जासूद, प्रथमेश शिंदे, अमर पाटील, निखिल मोरे, निलेश कांबळे, विशाल दोरकर, गीतांजली राजमाने, वंदना माने, अर्चना भोपळे, आरिफ बेपारी, प्रीतम मोरे, संदीप बुरुड आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी श्रीखंड, आम्रखंड व बासुंदीचे वाटप करून स्थापना दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास भाजप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.



Post a Comment

0 Comments