समर कॅम्प 2025 चे न्यु इंग्लिश स्कूल मध्ये आयोजन



अंबाजोगाई (वार्ताहर): येथील माईर एम. आय. टी. न्यू इंग्लिश स्कूल गुरुवार पेठ अंबाजोगाई या शाळेने मुलांच्या बौद्धिक  व शारीरिक क्षमता वाढण्यासाठी व निर्भेळ असा आनंद घेण्यासाठी समर  कॅम्प 2025 चे आयोजन केले आहे. दिनांक 26 एप्रिल ते 8 मे या कालावधीमध्ये समर कॅम्प पार पडेल.  यामध्ये चित्रकला, नृत्य, संगीत , नाटक, विविध प्रकारचे बौद्धिक व शारीरिक खेळ, अबॅकस, सहल, पोहणे, कथा अशा अनेक बाबींचा या समरकॅम्पमध्ये समावेश असेल.यासाठी 25 एप्रिल पर्यंत रजिस्ट्रेशन फी फक्त 699 ₹ भरुन आपण आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश भस्मे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments