विद्यार्थ्यांनो आत्मविश्वासाने पाऊल उचला आणि यशाचे शिखर गाठा- संचालक श्री संगप्पा बनदवार



अंबाजोगाई (प्रतिनिधी): माईर एम. आय. टी. पुणे संचलित न्यु इंग्लिश स्कूल, गुरुवार पेठ शाळेमध्ये आज दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला. याप्रसंगी शाळेचे संचालक श्री संगप्पा बनदवार सर मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संगप्पा सरांनी विद्यार्थ्यांनो 'आत्मविश्वासाने पाऊल उचला आणि यशाचे शिखर गाठा' असा गुरुमंत्र दिला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री शंकर मुंडे सर तर अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश भस्मे, वर्गशिक्षिका अनुजा पवार, माध्यमिक विभागाच्या प्रमुख रूपाली बांगर, नववीचे वर्गशिक्षक उत्तम शेप तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
 याप्रसंगी नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पुष्प व भेटवस्तू दिल्या. विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव विशद केले. 'गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी' म्हणत वातावरण भावुक झाले होते. मुख्याध्यापकांनी परीक्षा काळापुरतेच शिस्तबद्ध न राहता संपूर्ण आयुष्यभर शिस्तीत राहून आपला प्रगतीचा आलेख उंचावण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संस्कृती सोनकांबळे व यशस्वी धिमधिमे यांनी केले.


Post a Comment

0 Comments