अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथे श्री संत गजानन महाराज यांच्या 147 व्या प्रगटोत्सवाचे आयोजन *श्री दत्त मंदिर हाऊसिंग सोसायटी* येथे आयोजन केले आहे. श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ अंबाजोगाई यांच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून संत गजानन महाराजांचा प्रकटोत्सव अतिशय हर्षोउल्हासात साजरा करण्यात येतो. दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा. ब्रह्मवृंदाव्दारे रुद्राभिषेक, स.8 वा. श्री दासगणु महाराज रचित *'श्री गजानन विजय ग्रंथा'चे एक दिवसीय पारायण* आयोजित केले आहे. दि. 20 फेब्रुवारी रोजी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स. 6 वा. ब्रह्मवृंदाद्वारे रुद्राभिषेक, स.10 वा. *ह.भ.प. प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी, बीड* यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. श्री गजानन महाराजांचा ब्राम्हणाद्वारे मंत्रोच्चार करुन गुलाल उधळून प्रकटोसो साजरा केला जाईल. त्यानंतर महाराजांची पालखी, महाआरती व दु. 12:30 ते 3:30 पर्यंत महाप्रसाद आयोजित केला आहे. सायं. 6वा. नित्य गुरुवार उपासना होईल. तरी समस्त भक्तांनी या दोन दिवसीय उत्सवाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ अंबाजोगाई च्या वतीने करण्यात येत आहे.


0 Comments