अंबाजोगाई(वार्ताहर): येथील बालगंधर्व संगीत महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी संगीत (गायन, वादन, नृत्य) या प्रकारामधून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यास सर्वोत्तम पुरस्कार दिला जातो. शैक्षणिक व संगीत विषयासाठी दिला जाणारा ह्या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सायं. 5 वा. श्री संकटमोचन हनुमान मंदिर हाॅल मध्ये करण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. पुरस्कार वितरण समारंभानंतर संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संगीत अलंकार कुमारी श्रीदेवी पवार यांचे सुश्राव्य गायन होणार आहे. त्यांना तबला साथ श्री निलेश मस्के तर हार्मोनियम साथ श्री विश्वजीत धाट करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व संगीत रसिक, विद्यार्थी व अभ्यासू यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बालगंधर्व संगीत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.




0 Comments