बालगंधर्व संगीत महाविद्यालय अंबाजोगाई सत्र 2024 चे पुरस्कार जाहीर

अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील बालगंधर्व संगीत महाविद्यालय केंद्रातून वर्धापन दिनाच्या निमित्ताने दरवर्षी विशारद पूर्ण परिक्षेत सर्व प्रथम येणाऱ्यास "श्री मा.द.भस्मे सर्वोत्तम पुरस्कार" तर गायनासाठी "स्व. आरुणा अ. मुळे स्मृती पुरस्कार" दिला जातो.  सत्र 2024चा सर्वोत्तम पुरस्कार *कु.ईश्वरी रामेश्वर खाडे (भरतनाट्यम), मोहिनी सचिन कुलकर्णी (गायन), कु. मनाली डोंगरे व चि. आदित्य देशमुख (शिक्षण)* यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे बालगंधर्व संगीत महाविद्यालयाचे संचालक श्री महेश भस्मे यांनी सांगितले.  लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल अशी माहिती दिली.

Post a Comment

0 Comments