नव्या वर्षाची सुरुवात

नवीन वर्षाची करताना मनामध्ये प्रत्येकाच्या काहीतरी नवीन करणे सुरुवात करणे असे असते परंतु चांगल्या गोष्टींची सुरुवात ही फक्त नवीन वर्षानं करता ती आपल्याला जेव्हा वाटेल त्या दिवसापासून सुरुवात आपण करत असतो. चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी नवीन वर्षाचे निमित्त असेल तर हरकत नाही. चांगल्या गोष्टी , सवयी , कला, आवडीनिवडी, आपले छंद राहून गेलेले स्वप्न हे यावर्षी आपण पूर्ण करण्यासाठी नवीन वर्षी योजना करत असतो. 

परंतु त्या आठ दिवस अत्यंत काटेकोरपणे पाळल्या जातात पुढे मात्र त्या पाळल्या जात नाही नव्या नवरीचे नऊ दिवस ते काही उगीच नाही. ज्याला ही गोष्ट करायची ती मनापासून करण्यासाठी कोणताही दिवस योग्यच असतो असे वाटते. सुरुवातीला खूप उत्साह असतो पण तो हळूहळू काळानुसार कमी होतो. बऱ्याच जणांना वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात छंदही त्यांच्या असतात. ते पूर्ण करण्यासाठी धडपड ही ते करत असतात. 

बऱ्याच जणांना लहानपणी पासून ते मोठे होईपर्यंत अनेक छंद असतात परंतु तेव्हा ते पूर्ण न झाल्याने तसेच मग काय हरकत आहे नवीन वर्षापासून ते पूर्ण करण्यासाठी .एक आजीबाई होत्या त्यांना अत्यंत गाण्याचे आवड होती परंतु लहानपणी परिस्थिती नसल्यामुळे त्यांना त्यांचा छंद जोपासता आला नाही म्हणून त्यांनी साधारण 60 नंतर गाणे शिकायला सुरुवात केली तसेच हार्मोनियम सुद्धा शिकायला सुरुवात केली तर काय हरकत आहे आपली आवड आपणच जपली तर. आणि कोणतीही गोष्ट ही कोणत्याही वयात शिकता येते बरेच जण अर्धे वय झाल्यानंतर आपल्या आवडीनिवडी त्यांच्यासमोर येतात आपल्यामध्ये हे कलागुण आहेत हे त्यांना समजते मग त्यावेळेस सुरुवात करायला काही हरकत नाही असे वाटते. छंदांना वयाची अट नाही असे वाटते. आयुष्यामध्ये बरेच जण डिप्रेशनमध्ये जात असतात परंतु त्यामध्ये न जाता जर छंद आपले जोपासले गेले तर बऱ्यापैकी आपण त्यापासून वाचतो असे वाटते. 

ताण तणाव कमी होतो. काहींना वाचनाची आवड असते. तर काहींना गाणे म्हणणे. प्रत्येक जण तानसेन नसतो परंतु कानसेन होता येते. काहींना स्वयंपाकाची आवड असते वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची आवड असते तसेच बरेचसे छंद हे नवीन वर्षामध्ये सुरू करता येतील असे वाटते 

आयुष्यामध्ये अनेक गोष्टी बऱ्या किंवा चांगल्या वाईट ह्या होतच असतात परंतु त्यामध्ये न अडकता स्वतःसाठी काही नवीन सुरुवात करता येते का? हे बघणे गरजेचे आहे. स्वतःचे आयुष्य कसे जगायचे हे ज्याने त्याने ठरवायचे असते आपले छंद आपण सांभाळायचे असतात असे वाटते म्हणून या 2024 नंतर 2025 मध्ये आपण सगळे आपले छंद जोपासू या आणि मनसोक्त जगूया नवीन वर्षाची सुरुवात करताना सगळ्यांना एकदा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

- श्रुती पवार_जगताप. - मोबाईल नंबर 7020260192



Post a Comment

0 Comments