लातूरच्या बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूल मध्ये 6/12/ 2024 व 7/12/2024 या दिवशी क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य अनिल पॉल सर, उपप्राचार्य अजय शर्मा सर ,शाळेचे अध्यक्ष संभाजी सुळ सर , सीए दिगंबर साके सर ,संभाजी सरडे सर ,एडवोकेट सचिन सुळ सर,व्यवस्थापक वैजनाथ कदम सर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून झाली. यावेळी प्री प्रायमरी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या हस्ते मैदानावर क्रीडा ज्योत फिरविण्यात आली. प्री नर्सरी पासून ते युकेजी विद्यार्थ्यांकरीता विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेमध्ये बॉल पिकप अँड ड्रॉप रेस, बनी जम्प रेस, बॉटल फुल विथ वॉटर रेस, रिंग अँड बॉल रेस ,बुक बॅलेंसिंग इत्यादी स्पर्धा बालगोपालांसाठी आयोजित केल्या होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा अंकुलगे व सौ सपना संकाये या शिक्षकांनी केले तसेच खेळाचे परीक्षण शुभांगी गावकरे या शिक्षिकेने केले व मुलांना प्रोत्साहित केले.या खेळामध्ये समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य अनिल पॉल सर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पदके देण्यात आली. तसेच
प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी एरोबिक्स हे संगीत नृत्यासह सादर केले या कार्यक्रमांमध्ये सर्व प्री प्राइमरी शिक्षक विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ सोनाली चौधरी या शिक्षिकेने केले.


0 Comments