अंतरवली सराटी (प्रतिनिधी):
मराठायोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी चौदा महिने मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि सगे-सोयऱ्यांचा अध्यादेश काढावा म्हणून आंदोलन केले. परंतु सरकारने समाजाच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. उलट सरकारमधल्या नेत्यांच्या सांगण्यावरून शांततेत चाललेल्या आंदोलनात सहभागी आसलेल्या मराठा तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांचे भवितव्य अंधारात टाकण्याचे महापाप सरकारने केले. दादांनी गेल्या लोकसभेच्या निवडणूकीत आरक्षणाला विरोध करणारे पाडा म्हणताच मराठा समाजाने अनेक दिग्गज पाडले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकीआधी मराठा समाजाच्या मागणीचा विचार होणे आवश्यक होते. मराठा समाज निवडणुकीत काय करु शकतो हे अख्या देशाला माहित झाले आहे. याचा प्रत्यय लोकसभेला आलेला आहेच. सरकारने आचारसंहिता लागायच्या आत मराठा समाजाचे आरक्षण व सगें-सोयऱ्यांचा अध्यादेश काढणे आवश्यक होते. परंतु मराठा समाजाच्या मागणीची विचार न करता समाजाच्या तोंडाला पाने पुसली. आता मनोजदादा जरांगे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणारे पाडावेतच परंतु २८८ जागेवर विस्थापित असलेले निवडूण आणावेत तरच मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सगे-सोयऱ्याचा अध्यादेश काढण्यासाठी आपण महत्त्वाची भूमिका बजावणार आहोत. अशी माहिती शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा जरांगे पाटील समर्थक सुरेश पाटील यांनी समाज माध्यमात दिली आहे.
देशातील सर्वसामान्य समाजाच्या मागणीचा विचार लोकाभिमुख सरकारने केला पाहिजे. हे लोकशाहीला अभिप्रेत आहे. परंतु आजपर्यंत निवडून गेलेले लोकप्रतिनिधीना संविधानाचा कसलाच अभ्यास नसल्याने फक्त घराणेशाहीत जन्म झाला म्हणून लोकप्रतिनिधी झाला. अशी अवस्था या आमदार, खासदारांची झालेली आहे. पक्षाचे व आपल्या नेत्यांच्या मनाविरुद्ध कोणतेही काम करायचे नाही. अशी भूमिका घेतल्यामुळे सर्वसामान्य माणसाचे कोणतेच प्रश्न आजपर्यंत सुटलेले नाहीत. ते गरिबांचे सरकार आल्याशिवाय सुटणार ही नाहीत. म्हणून मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे लोकप्रतिनिधी तर पाडावेच परंतु सर्वसामान्य घरातील सुशिक्षित, संविधान अभ्यासक विधानसभेत पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली शिवशाही महाराष्ट्रात आणावी आणि महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या प्रश्नांची सोडवणुक करावी. आशिही माहिती समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी माध्यमात केली आहे.


0 Comments