कशासाठी फोटोसाठी.

जीवन जगताना कुणाचे साधे सहज जीवन असते तर कुणाला आयुष्यामध्ये खूप कष्ट करावे लागतात सहजपणे जीवन जगता येत नाही खूप काबाडकष्ट करून दोन वेळेस चे जेवणाची भ्रांत पडलेली असते. 

तर खूप जणांकडे भरपूर पैसा असतो त्यामुळे दोन्ही वेळेस चे जेवण हे मेजवानी सारखे असते. 

असेच मी कुटुंबासोबत काशीला गेलेली होती. तेथे फोटोच्या शोधात असताना अचानक छोटी मुलगी समोर आली ताई कशी दिसते मला विचारले तर मी दोन-तीन मिनिट स्तब्ध झाली. कारण ती फक्त दोन ते तीन वर्षाची मुलगी होती. तिला तिच्या आईने शंकराचे रूप दिलेले होते. जटा, गळ्यात नाग, रुद्राक्षांची माळ, वाघाच्या कातड्याचा ड्रेस आणि हातात एक डब्बा. 

खूप छान गोंडस दिसत होती ती. परंतु पोट भरण्यासाठी एवढ्याशा मुलीला त्यांनी भीक मागण्यासाठी शंकराचे रूप दिलेले होते. 

सगळ्यांकडे ते हात पसरून भीक मागत होती. 

तिथे मला अनेक मुले दिसत होती. प्रत्येक जण काही ना काही रूप घेऊन येणारा जाणारा कडे हात पसरून भीक मागत होती. ज्या वयात खेळायचे बागडायचे त्या वयात त्यांना घराची जबाबदारी पेलण्यासाठी भीक मागून घराचा उदरनिर्वाह करावा लागत होता. 

इतकी लहान वय असून सुद्धा खूप मोठे असल्यासारखे ती छोटी मुलं वागत होती हे पाहून मला खूप वाईट वाटले. 

ज्या वयात फक्त खेळायचे असते इतर जबाबदाऱ्या नसतात त्या वयात त्यांना मोठे व्हावे लागत होते. 

ती मुलगी इतकी गोड दिसत होते की मला फोटो काढावासा वाटला मी तिला सांगितले की मला एक फोटो तुझा काढू दे तर ती म्हणाली पहिले पैसे दो फिर बाद मे फोटो भेजो. 

माणूस इतका लाचार होतो की पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडील छोट्या मुलीला भीक मागायला सांगत होते. पूर्वी सुद्धा वेगवेगळे रूप घेऊन कला सादर केल्या जात होत्या. पण बिहारमध्ये वेगळेच पाहण्यास मिळाले. 

मी फोटो काढत असताना तिची बहीण अडवत होती मत निकालो पहिले पैसे बाद में खिचो. तिला थोडे पैसे देऊन त्यानंतर तिने भराभर पोच द्यायला सुरुवात केली. आजही मला तिचा चेहरा आठवतो. पण वाईटही वाटत होते ज्या वयात काहीच कळत नसते त्या वेळात तिला लोकांकडे भीक मागावी लागत होते यासारखे वाईट गोष्ट नाही. 

तिच्या नशिबी लोकांकडे हात पसरून भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. 

मी फोटो काढला घरी आल्यावर विचार केला की हे सर्व काय आहे गरिबी माणसाला इतकी लाचार बनवते सर्व काही करण्यास भाग पाडते कोरोना नंतर ही परिस्थिती बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळते.

- श्रुती पवार जगताप नाशिक 

Post a Comment

0 Comments