सदर खटला हा परिस्थितीजन्य पुराव्या आधारे सरकार पक्षाने सिद्ध केला सदर प्रकरणांमध्ये लास्ट सीन थेरी महत्वाची ठरली
खटल्याची थोडक्यात माहिती
फिर्यादी भागवत बलसुरे राहणार तपसे चिंचोली यांनी दिलेल्या एफ आय आर नुसार त्याचा भाऊ कुमार याची बायको कमल बरसूरे हिचे तिच्या मामाचा मुलगा याच्या सोबत अनैतिक संबंध होते त्यात कुमार हा अडथळा होत असल्यामुळे कुमार बनसोडे याची पत्नी हिने मामाचा मुलगा व इतर दोन आरोपी यांच्याशी संगणमत करून आपसात कट रचून कुमार याचा गळा आवळून खून केला अशी फिर्याद दिली
दिनांक 1/11/ 2022 चे रात्री साडेनऊ वाजण्याच्या नंतर ते सकाळी 2/11 /2022 चे सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान गाढवेवाडी शिवारात नाक तोंड व गळा दाबून त्याचा खून केला अशी फिर्याद आरोपीं विरुद्ध दाखल झाली त्या अनुषंगाने पोलीस तपासात घटनेच्या अनुषंगाने मयत कुमार यांचे घराशेजारी राहणारा त्याचा भाऊ एक शेजारी यांनी आरोपी विजय, योगेश येऊन कुमारला घेऊन गेल्याचे शेजारी यांनी पाहिले होते
तसेच मयत कुमार प्रेत पाहताना जमलेल्या लोकांनी त्याच्या पत्नीचे आरोपी विष्णू यांच्या अनैतिक संबंध होते हे साक्षीदारांच्या जबाब पुराव्यात आले
या अनुषंगाने एकूण दहा साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले
यात चारही आरोपींना आरोपी विरुद्ध कलम 120 ब भादवी गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तसेच सोबत दहा हजार दंडाची शिक्षा ठोटोवण्यात आली दंडाचे एकूण 40 हजार रुपये मयत कुमार याच्या लहान मुलांचे पालकत्व घेणाऱ्यांना त्याच्या शिक्षणासाठी वापरण्या चे निर्देश देण्यात आले सहाय्यक सरकारी वकील म्हणून अडवोकेट मीरा मनोज कुलकर्णी व त्यांचे सहकारी अँड दिग्विजय माकणे अँड ईश्वर वर्मा यांनी सहकार्य केले सदर प्रकरणाचा तपास ए पीआय श्री सुनील गायकवाड साहेब यांनी केला सदर प्रकरणांमध्ये पोलीस नाईक पंढरीनाथ सोमवंशी यांनी मोलाचे सहकार्य केले.

0 Comments