बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या दोन खेळाडूंची राजस्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये निवड




लातूर येथील बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या अहमदपूर येथे नुकतेच पार पडलेल्या विभागीय शालेय नेटबॉल स्पर्धा मध्ये शाळेच्या दोन  विद्यार्थिनी जयंत माने व उजेफ नवाब यांनी 17 वर्षाखालील मुले वयोगटांमध्ये  चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड   झाली आहे. या झालेल्या यशाबद्दल लातूर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले आहे तसेच लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष क्रीडा अधिकारी आदरणीय लकडे साहेब, लोदगेकर साहेब यांचेही खेळाडूंना मार्गदर्शन लाभले व त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या मिळालेल्या यशाबद्दल शाळेतील क्रीडा शिक्षक नवनाथ आगलावे व शुभांगी गावकरी या क्रीडा शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य अनिल पोल, उपप्राचार्य अजय शर्मा, व्यवस्थापक वैजनाथ कदम, तसेच संस्थेचे अध्यक्ष संभाजी सुळ सर, सीए दिगंबर साके सर, सीए संभाजी सरडे सर, एडवोकेट सचिन सुळ सर, शाळेतील सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.

Post a Comment

0 Comments