बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूलचे राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये दोन खेळाडूंची निवड


लातूर येथील बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच पार पडलेल्या विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा मध्ये  क्रीडा संकुल येथे पार पडल्या यामध्ये शाळेच्या विद्यार्थिनी सौम्या कावळे व समायरा कलाल यांनी अकरा वर्षाखालील मुलींच्या वयोगटांमध्ये इनलाईन या प्रकारामध्ये अनुक्रमे द्वितीय  व तृतीय  क्रमांक मिळवला व चांगली कामगिरी केली या मुलींची निवड ड दिनांक 20 व 21 ऑक्टोबर 2024 रोजी   मुंबई विरार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या दोन मुलींची या स्पर्धेतील यशाबद्दल क्रीडा शिक्षक लायक सय्यद सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे या विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेचे प्राचार्य अनिल पोल, उपप्राचार्य अजय शर्मा, व्यवस्थापक वैजनाथ कदम, तसेच संस्थेचे अध्यक्ष संभाजी सुळ सर, सीए दिगंबर साके सर, सीए संभाजी सरडे सर, ॲड.सचिन सुळ सर, शाळेतील सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.

Post a Comment

0 Comments