बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये दांडिया महोत्सव उत्साहात साजरा



बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसऱ्यानिमित्त शाळेमध्ये रावण बनवण्यात आला होता असत्यावर सत्याचा विजय कसा मिळाला याचा एक संदेश विद्यार्थ्यांना दिला हे रावण बनवण्यासाठी शाळेतील कलाशिक्षक महेश शिंदे सर तसेच विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला होता. त्यानंतर सकाळी शाळेमध्ये रावण उभा करून रावण दहन करण्यात आले त्यावेळेस शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच पालकांनीही रावण दहन करते वेळेस पाहिले आणि सायंकाळी विद्यार्थ्यांसाठी दांडिया ठेवण्यात आले होते या दांडियासाठी विद्यार्थ्यांचा तसेच महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रचना जाजू मॅडम यांची उपस्थिती लाभली होती दांडिया रास मध्ये विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी वेगवेगळी पारितोषिके ठेवण्यात  ठेवण्यात आलेली होते शाळेचे प्राचार्य अनिल पोल, उपप्राचार्य अजय शर्मा, व्यवस्थापक वैजनाथ कदम, तसेच संस्थेचे अध्यक्ष संभाजी सुळ सर, सीए दिगंबर साके सर, सीए संभाजी सरडे सर, एडवोकेट सचिन सुळ सर, शाळेतील सर्व शिक्षक यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना प्रोत्साहन दिले. याचबरोबर फिटनेस ट्रेनर रोहिनी दायमाजी, स्नेहा सारडा आणि गौरवी सारडा यांनी गरबा, दांडिया अशा विविध राऊंड्स चे अचूक परीक्षण करत विद्यार्थ्यांना वा पालकांना पारितोषिके देऊन प्रोत्साहन केले. हा पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये नृत्य शिक्षक अक्षय बारस्कर, कार्यक्रम समनवयक दत्ता कांबळे व सर्व शिक्षक स्टाफ ने मोठे योगदान दिले.

Post a Comment

0 Comments