लातूर येथील बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच पार पडलेल्या क्रीडा संकुल येथील विभागीय स्केटिंग स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर अशी कामगिरी करून या मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी समयरा कलाल व सोम्या कावळे या दोन मुलींची निवड झाली आहे या स्पर्धेतील यशाबद्दल क्रीडा शिक्षक लायक सय्यद सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेचे प्राचार्य अनिल पॉल, उपप्राचार्य अजय शर्मा, व्यवस्थापक वैजनाथ कदम, तसेच संस्थेचे अध्यक्ष संभाजी सुळ सर, सीए दिगंबर साके सर, सीए संभाजी सरडे सर, एडवोकेट सचिन सुळ सर, शाळेतील सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.


0 Comments