श्री योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी गणेश उत्सव आयोजित गणेश व्याख्यानमालेत दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रमुख व्याख्याते प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी भारतीय कृषी व पशुपालन संस्कृती काल ,आज आणि उद्या या विषयावर उपस्थित त्यांना सखोल मार्गदर्शन केले. नागापूरकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मा. श्री. अंगद कराड विचार पिठावर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी भारतीय कृषी संस्कृतीचा इतिहास वर्णन केला. आधुनिक काळात शहरीकरण व औद्योगीकरणामुळे शेतीचे विहित क्षेत्र कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली. पशुसंवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी पशूंची पैदास, त्यांचे व्यवस्थापन, आरोग्य व त्यापासून अधिक उत्पादकता काढण्यासाठी शेतकरी व दोग्धा यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत मांडले.
या कार्यक्रमासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मा. डॉ. सुरेश खुरसाळे, लातूर येथील सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक माननीय श्री शिवाजी गिरी, राष्ट्रपती पुरस्कार विजेते सेवानिवृत्त निरीक्षक मा. सय्यद रहेमान यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, गणेश व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य रमण देशपांडे ,प्रा. डॉ. शैलजा बरुरे ,प्रा. डॉ. गणेश पिंगळे प्रा. एस. पी. कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गंगणे यांनी केले.


0 Comments