गहिनीनाथ गडासाठी तीर्थक्षेत्र विकास निधी दिल्याबद्द्ल मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार... सुरेश पाटील



पाटोदा प्रतिनिधी 

     राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यापैकी पाटोदा तालुक्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र गहीनाथ गडाला २ कोटी ६७ लाख रुपये निधीला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा समाजसेवक सुरेश पाटील यांनी जाहीर आभार मानले आहेत.

     तसेच या तीर्थक्षेत्र विकासाच्या निधीमध्ये क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या सरकारमधील मंत्री तसेच उच्चपदस्थ शासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित उपस्थित होते. अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे आपण राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी आपण भरीव निधी उपलब्ध करून देत आहोत. त्याप्रमाणे या तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. यासर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले. पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप व दर्शन रांग सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. भगूर (जि. नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क साकारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या चाळीस कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच पहिल्या टप्प्यातील १५ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. आष्टी मतदारसंघातील प्रसिद्ध श्री क्षेत्र गहिनीनाथगड चिंचोली तालुका पाटोदा च्या विकास आराखड्यातील २ कोटी ६७ लाखांच्या कामांस मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांचे जाहीर आभार मानले असून आलेल्या निधीचा योग्य वापर होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत  असेही समाज माध्यमात सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी बोलतांना केले.

Post a Comment

0 Comments