रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी तर्फे दिला जाणारा नेशन बिल्डर अवॉर्ड म्हणजेच आदर्श शिक्षक पुरस्कार तब्बल आठ शिक्षक होणार सन्मानित
यावर्षीचे सन्माननीय अध्यक्ष कल्याण काळे व सचिव धनराज सोलंकी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे यावर्षी दरवर्षीप्रमाणे *नेशन बिल्डर अवॉर्ड* 2024-25 म्हणजेच आदर्श शिक्षक पुरस्कार हा अंबानगरीतील आठ नामांकित शाळेतील अध्यापकांना दिला जाणार आहे . यामध्ये प्रामुख्याने श्री. मधुकर जाधव सर (खोलेश्वर माध्यमिक विद्यालय) , अतिकोदिन सय्यद ( डॉ मोहम्मद इकबाल हायस्कूल अँड कॉलेज), श्रीमती तीलोतमा इंगोले(पतकराव) (योगेश्वरी नूतन विद्यालय), श्रीमती सविता जाधव (सोमेश्वर कन्या प्रशाला घाटनांदुर), श्रीमती सुरेखा रणखांब (स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर अंबाजोगाई ), श्रीमती भाग्यश्री गाढवे (व्यंकटेश विद्यामंदिर ), श्रीकृष्ण जिरे (सिनर्जी नॅशनल स्कूल ऑफ अंबाजोगाई), महामुनी सर (न्यू विजन पब्लिक स्कूल अंबाजोगाई) अशा आठ मान्यवर शिक्षकांची निवड ही मतदान पद्धतीने विद्यार्थ्यांकरवी करण्यात आली . विद्यार्थ्यांनी अतिशय विचारपूर्वक उत्कृष्ट व आदर्श शिक्षकाची निवड केली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या उपक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ निशिकांत पाचेगावकर असून , रोटरी अध्यक्ष कल्याण काळे व सचिव धनराज सोलंकी यांनी अंबा नगरीतील सर्व पत्रकार बांधव, सर्व सन्माननीय व सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे .
हा सोहळा दिनांक 16 सप्टेंबर रोजी ठीक 3:00 वाजता *विलासराव देशमुख सभागृह नगरपरिषद* येथे होणार आहे.
तेव्हा या सोहळ्यास उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा असे आवाहन रोटरीचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री डॉक्टर पाचेगावकर सर यांनी केले आहे.



0 Comments