शिरूर (का.) /प्रतिनिधी
आष्टी मतदारसंघातील शिरूर कासार शहराच्या नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष रोहिदासभाऊ गाडेकर यांना शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळी त्यांचा फेटा, शाल व श्रीफळ देऊन सहृदय सत्कार करून भावी आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शिरूर कासार शहराचे ज्येष्ठ नेते तथा नगरपंचायत चे प्रथम नगराध्यक्ष रोहिदास भाऊ गाडेकर यांचा वाढदिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रोहिदास भाऊ गाडेकर गेली ४० वर्षे राजकीय जीवनात विविध पदावर उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक निवडणुका लढल्या आणि जिंकल्याही. रोहिदासभाऊ गाडेकर यांनी जनतेच्या कामासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आपल्याला पहावयास मिळतो. भाऊंचा संपूर्ण वेळ राजकारण कमी आणि समाजकारण जास्त, धार्मिक कामात तर ते नेहमी अग्रेसर असतात आज तरुणांना लाजवेल असे काम रोहिदासभाऊ गाडेकर यांनी तालुक्यामध्ये केलेले आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनीही त्यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या.
आज पर्यंत रोहिदासभाऊ गाडेकर यांनी चार वेळेस सरपंच पद, पंचायत समिती सदस्यपद, शिरूर कासारच्या ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान रोहिदासभाऊ गाडेकर यांना मिळाला. शिरूर तालुक्याच्या रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष पदही त्यांना मिळाले होते. सध्या नगरपंचायतचें विद्यमान नगराध्यक्षापदही त्यांच्याच घरात आहे. त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई रोहिदास गाडेकर सद्या नगरपंचायच्या नगराध्यक्षा आहेत. यावेळी अनेक मान्यवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास उपस्थित होते.


0 Comments