तोफा वाजवून समाजसेवक सुरेश पाटलांचे केले स्वागत.
अमळनेर गटात पुजा व आरत्या करून केला 'श्री गणेशा '
अंमळनेर/प्रतिनिधी
शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांचे अंमळनेर गटात तोफा वाजवून स्वागत केले गेले. अंमळनेर गटातील राजधानी असलेल्या पिंपळवंडीसह अनेक गावांत सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी श्री गणेशाची आरती करून मनोभावे पुजा केली.
यावेळी सरपंच, सदस्यांसह गावकऱ्यांनी आणि तरुणांनी तोफा वाजवून समाजसेवक सुरेश पाटील यांचे उस्फूर्त स्वागत केले व 'श्री गणेशा' ची पूजा व आरती करण्याचा मान दिला. त्यांच्या बरोबर गावकऱ्यांशी सामाजिक, राजकीय विषयावर व असलेल्या समस्या वर पाटलांसोबत चर्चा केली.
अमळनेर गटातील सौताडा, कुसळंब, सुप्पा, सावरगाव घाट वहाली, निवडुंगा, चिखली, चिंचोली, कोतन, दौलतवाडी, अंमळनेर, मिसालवाडी, गांधनवाडी, पिंपळवंडी, येवलवाडी, पारनेर, बेदरवाडी, जरेवाडी, शरदवाडी, चंद्रवाडी, आंबेवाडी, आदी वस्ती-वड्यांवर शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा भावी उमेदवार सुरेश पाटील यांनी गावभेटी दौरा केला. आष्टी विधानसभेचा 'श्री गणेशा' करत विघ्नहर्त्या बाप्पाचे व गावकऱ्यांचे आशीर्वाद घेतले. अनेक विविध सामाजिक, राजकीय, विषयांवर दिलखुलास चर्चा करून गावाच्या आणि गावकऱ्यांच्या समस्याही सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी जाणून घेतल्या. यावेळी अंमळनेर गटातील राजधानी असलेल्या पिंपळवंडी मध्ये तर तोफा वाजून भव्य असे स्वागत कऱण्यात आले. यावेळी गावचे सरपंच सदस्यासह प्रतिष्ठित नागरिक, गणेश मंडळाचे सदस्य, गणेश भक्त अडी उपस्थित होते.


0 Comments