सरस्वती गणेश मंडळ गुरुवार पेठ आंबेजोगाई दि 8/9/2024 वार रविवार यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झाले.
शिबिरात 25 गणेश भक्तांनी रक्तदान केले आहे.या मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक व सांस्कृतिक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात.
रक्तदानाचे महत्त्व लक्षात आल्यानंतर या मंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित क
केले जाते.यावर्षी आयोजित या शिबिरात पहिल्या टप्प्यात 25 दात्यांनी रक्तदान केले.देशाच्या उन्नतीसाठी युवकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे म्हणून सरस्वती गणेश मंडळाचे सर्व सदस्य हे समाज कार्य करत आहे.रक्तदान शिबिराचे उद्घाटन तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वा.रा.ती.सर्जरीचे डॉ. सतीश गिरेभोईनवाड,डॉ नागेश,रोटरीचे कल्याण काळे,धनराज सोळंकी,ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार,किशोर परदेशी,बालासाहेब कदम,दिनेश परदेशी,रवी परदेशी,रक्त संकलनासाठी स्वा.रा.ती. अंबाजोगाई टीम उपस्थित होती.या रक्तदान शिबिरात कुलदीप परदेशी,समीर लाटा,शेख मोहीम शेख चांद पाशा,सय्यद अरबाज अरजद,निहाल परदेशी,सुरेश राठोड,अश्विन परदेशी,हर्ष परदेशी, वैभव कुलकर्णी,संतोष शिंदे,सौरभ चौभारकर,आशिष परदेशी,शुभांगी मोदी,नीता परदेशी,(महिला रक्तदाते) सुमित मुंडे,चेतन परदेशी,सो.दिव्या रोहित मोदी,कमलेश परदेशी,संतोष शिंदे,रोशन परदेशी,सचिन गुप्ता,यश प्रदीप मोदी यांनी रक्तदान केले.
यावेळी सरस्वती गणेश मंडळचे निलेश मुथा,योगेश परदेशी,अक्षय परदेशी,रचना परदेशी,साक्षी परदेशी, निलेश परदेशी,संजय अपूर्वा व सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. मोफत रक्तांची तपासणीत सीबीसी,एलएफटी,केएफटी,शुगरची केल्या गेल्या. लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.


0 Comments