जिजाऊ विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी

अंबाजोगाई शहरातील जिजाऊ विद्यालय या सेमी माध्यमाच्या शाळेत गोकुळाष्टमी- गोपाळकाला निमित्त विद्यार्थ्यांची दहीहंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. शालेय शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृती, परंपरा या विद्यार्थ्यांमध्ये रुजल्या पाहिजेत इतिहासाचा जागर झाला पाहिजे या प्रांजळ हेतूने शाळेमध्ये दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असे मुख्याध्यापिका श्रीमती मोहिनी जाधव यांनी सांगितले. 

जिजाऊ विद्यालय नेहमीच वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबवत असते, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा अभ्यासक्रमाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ज्ञान देणे गरजेचे आहे तसेच देशाचा उत्तम नागरिक बनवण्यासाठी या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्यामुळे जिजाऊ शाळा चार भिंतीच्या आतील शिक्षणाबरोबरच विविध उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मोहिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा शिंदे, रंजना माळी, अनुराधा काळे, गीता सोळंके, ईश्वरी शिंदे, अनुराधा पांचाळ यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments