अंबाजोगाई : माईर्स एम. आय. टी. पुणे संचालित न्यू इंग्लिश स्कूल, गुरुवारपेठ शाळेतील इतिहास व इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सौ. अनुजा पवार मॅडम यांनी इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र राज्य कोल्हापूर आयोजित निबंध स्पर्धेत इंग्रजी माध्यमातून राज्यातून दुसरा क्रमांक मिळविला. या बद्दल त्यांना ‘डॉ. अ . रा. कुलकर्णी पुरस्काराने’ २५ ऑगस्ट रोजी पुणे येथे सभागृहामध्ये गौरवचिन्ह, विशेष प्रमाणपत्र, रोख रकमेसह सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल माईर्स एम. आय. टी. पुणेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, अंबाजोगाई विभागाचे कार्यकारी संचालक श्री राजेश कराड सर, शाळेच्या प्रशासकीय अधिकारी सौ. शुभांगीताई कराड मॅडम, संचालक श्री संगप्पा सर, मुख्याध्यापक श्री महेश भस्मे सर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


0 Comments