*बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये वन महोत्सव सप्ताह निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीला व वृक्षारोपण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद* .
लातूर येथील बिर्ला ओपन माईंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक ०५/०७/२०२४ ला वन महोत्सव निमित्त शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमासाठी या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सायस कराड साहेब फॉरेस्ट अधिकारी तसेच इम्रान सय्यद सर माजी नगरसेवक तसेच ग्रीन वृक्ष टीमचे सदस्य शाळेचे अध्यक्ष संभाजी सुळ सर ,सीए दिगंबर साके सर, सीए संभाजी सरडे सर ,ऍड सचिन सुळ सर, पोलीस विभागातून आलेले पोलीस उपनिरीक्षक मुळे साहेब हे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले सायस कराड यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन दिले त्यांनी मुलांना झाडांचे किती महत्त्व जीवनामध्ये आहे हे मुलांना पटवून दिले एक झाड लावल्यानंतर माणसाला किती फायदा होतो हे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगितले . प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमीत कमी एक झाड लावून त्यांची संगोपन करावे हे त्यांनी मुलांना त्यांच्या भाषणामध्ये सांगितले. इम्रान सय्यद सरांनी ही त्यांच्या भाषणामध्ये झाडाचे महत्व पटवून दिले ते अनेक वर्षापासून ग्रीन वृक्ष लागवड यांच्या माध्यमातून लातूर व लातूरच्या परिसरात भरपूर प्रमाणात झाडे लावले आहेत व त्यांचे संगोपन ही करत आहेत ते त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितले. अशा पद्धतीने प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन दिले तसेच शाळेच्या प्राचार्य अनिल पोल ल सरांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार प्रदर्शन केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे आगमन केले व ही रॅली मयुर बन कॉलनी ,कॉक सेट कॉलेज ,अजिंक्य सिटी मार्गे ,रेणापूर नाका ,रिलायन्स कॉलेज, बस स्टँड नंबर दोन अशा पद्धतीने शाळेतील मुलांनी तसेच शाळेतील कर्मचारी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी झाडे लावली झाडांचे महत्त्व तसेच वृक्ष लागवड करून कार्यक्रमाची सांगता शाळेमध्ये येऊन केली. कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये शाळेतील उपप्राचार्य अजय शर्मा सर तसेच शाळेचे व्यवस्थापक वैजनाथ कदम सर क्रीडा शिक्षक तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले.



0 Comments