बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूल मध्ये "आंतरराष्ट्रीय योग दिन" उत्साहात साजरा..

 *बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूल मध्ये "आंतरराष्ट्रीय योग दिन" उत्साहात साजरा..*


*वार्ताहर- शुभांगी गावकरे* 

 **लातूर मधील बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूल मध्ये २१ जुन "आंतरराष्ट्रीय योग दिन" उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल पॉल सर होते. तसेच उपमुख्याध्यापक अजय शर्मा प्रशासकीय अधिकारी वैजनाथ कदम शाळेतील क्रिडा शिक्षक शुभांगी गावकरे व नवनाथ आगलावे तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थी खूप उत्साहीत होते. योग प्रशिक्षिका शुभांगी गावकरे यांनी विद्यार्थ्यांना योगासने शिकवली. शाळेतील शिक्षिका काव्या कोमटवाड व शिखा डांगी यांनी योगाचा इतिहास आणि जीवनातील उपयोगिता विषयावर भाषण केले. तसेच दिपाली जनगावे यांनी योगासनाच्या माध्यमातून आपण स्वतःला कसे निरोगी ठेवू याबद्दल माहिती दिली व शेवटी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.*

Post a Comment

0 Comments