मोफत मोतीबिंदू निदान व नेत्रतपासणी शिबिराचे दहीगाव ने येथे आयोजन

 मोफत मोतीबिंदू निदान व नेत्रतपासणी शिबिराचे दहीगाव ने येथे आयोजन

प्रतीनीधी प्रविण भिसे शेवगाव जि.अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक सातदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदु निदान व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन ९ मे रोजी करण्यात आले आहे. वाढदिवस म्हटल की मोठमोठ्या हॉटेलमध्ये मद्यपान जेवणाच्या वगैरे पार्ट्या आलच. परंतु दिपक सातदिवे यांनी मित्र परिवार नातेवाईक मंडळी हे वाईट मार्गाने जावु नये या उदात्त हेतुने हा केलेला हा एक प्रयत्न आपल्या शरीराच्या प्रमुख अवयवांपैकी  एक महत्वाचा अवयव म्हणजे डोळे तर आजकाल आपल्यापैकी डोळ्यांच्या कुठल्यान कुठल्या आजाराने अनेक अबाल वृद्ध व तरुण वर्ग त्रस्त आहे आणी दिपक सातदिवे यांनी नेमक हिच बाब हेरली व डोळ्यांच्या सर्व आजारांच्या शिबीराचे आयोजन केले आपणही समाजाचे काही देण लागतो याच प्रामाणिक हेतुने त्यांनी हे आयोजन केल आहे सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शंभुराजे युवा प्रतिष्ठान च्या वतीने केल आहे. शिबीराची वेळ ९ ते ५ राहील व शिबीराचे ठिकाण ग्रामीण रुग्णालय दहीगाव ने आहे.





Post a Comment

0 Comments