बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा..




लातूर मधील बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूल मध्ये १ मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शाळेचे सर्वेसर्वा डायरेक्टर श्री.संभाजी सुळ सर होते.तसेच श्री.सचिन सुळ मुख्याध्यापक अनिल पॉल सर उपमुख्याध्यापक अजय शर्मा प्रशासकीय अधिकारी वैजनाथ कदम तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.श्री.संभाजी सुळ सरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यावर शाळेतील संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर करून आलेल्या पाहुण्यांचे व पालकांचे मन जिंकले.सौ.मंजुषा वाडेकर यांनी आपले भाषण केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सौ.दिपाली कानझाडे  यांनी केले.तसेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.आलेल्या पालकांना ते पाहण्यात यावे म्हणून कला प्रदर्शन आयोजित केले.त्याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments