काँग्रेस सेल विभागाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे काम -प्रज्ञा वाघमारे



सोलापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या सूचना आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत सेल विभागाचे पदाधिकारी प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी उतरले आहेत.

खा.राहुलजी गांधी,राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे काढलेले गॅरंटी कार्ड जाहीरनामा मतदारा पर्यंत पोहोचण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या सेल विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. कार्यकर्ते पदाधिकारी यांना सन्मान प्रशिक्षण नावीन्य पूर्ण उपक्रमाला प्रोत्साहन कार्यक्रम सातत्य ठेऊन राबवले जात आहेत.सकारात्मक विचाराने कार्यकर्ते जोडले जात आहेत.43 सेल विभाच्या माध्यमातुन काँग्रेसने सामाजिक बांधिलकीचे काम जपले आहे, जपत असल्याचे काँग्रेस सेल विभागाच्या मुख्य संयोजिका प्रज्ञा वाघमारे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

सेल विभाग प्रदेश प्रमुखांची टीम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचारासाठी रस्त्यावर उतरली आहे.

सोलापूर येथे लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारा निमित्त माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत काँग्रेस सेल विभाग मुख्य संयोजिका प्रज्ञा ताई वाघमारे, माथाडी कामगार प्रदेश प्रमुख छगन पाटील,एसटीएस काँग्रेसचे प्रदेश प्रमुख सुरेश यादव,रोजगार स्वयंरोजगार विभाग प्रदेश प्रमुख योगेश पाटील, औद्योगिक विकास सेल प्रमुख डॉ.हेमंत सोनारे,घरेलू कामगार विभाग पुजा जेधे,सुरक्षा विभाग भागेश देसाई टीमने संवाद साधून प्रचाराची रणनीती प्रचार कार्याचे नियोजन जनतेचा असलेला प्रतिसाद याबाबतीत सखोल चर्चा केली.

या प्रचार अभियानामध्ये काँग्रेस पक्ष सर्व स्तरातून जनतेचा युवकांचा शेतकरी शेतमजूर व्यापारी महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

याप्रसंगी उपस्थितीमध्ये जिल्हा शहर काँग्रेसअध्यक्ष चेतन नरोटे, विजयकुमार हातूरे,अशोक कलशेट्टी,कुणाल घोडके,अशोक पाटोळे,पप्पू शेख, राजेंद्र शिरकुर,चांद पाशा ,उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments