दहिगाव ने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवला कलागुणांचा आविष्कार ..... चिमुकल्यांनी केला जल्लोष




पत्रकार प्रविण भिसे शेवगाव जि अहमदनगर

दिनांक ७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव ने येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला . 

स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन  मा. जि.प. अध्यक्ष  श्रीम.राजश्रीताई घुले यांनी केले. तसेच प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन दहिगाव ने गावच्या सरपंच मा. सुनीताताई कांबळे तसेच उपसरपंच मा. श्री. राजाभाऊ  पाऊलबुधे यांनी केले. 

 याप्रसंगी मान.राजश्रीताई घुले यांनी शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम तसेच सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले. उपसरपंच श्री.सुर्यकांतजी पाऊलबुद्धे यांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक करत चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी  शैलजाताई राऊळ व दहिगाव ने केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले.विषयतज्ज्ञ श्री त्रिंबक फपाळ यांनी खास विद्यार्थी व शिक्षकांच्या आग्रहास्तव गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. 
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन व सदस्य, दहिगाव ने केंद्रातील शिक्षक तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, गावकरी,विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

मा.विनयजी पाऊलबुद्धे साहेब यांनी शाळेतील बालचिमूरड्यांना पिण्याचे थंडगार पाणी मिळावे यासाठी सुमारे ३५ हजार किमतीचा वॉटर कुलर शाळेला भेट दिला.
मिशन आपुलकी अंतर्गत गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत रोख स्वरूपात सुमारे ४० हजार रुपये वर्गणी शाळेसाठी दिली आहे.

वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मुख्याध्यापक श्री. राजेश  खंडागळे,श्रीम.संगीता भुसे, श्रीम.राजश्री खंडागळे, श्री. मनोहर बैरागी, श्रीम्. रत्ना वैष्णव, श्री.संतोष वाघ, श्रीम. मीराबाई डमाळे ,श्रीम.कविता बामदळे या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments