जनसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासावी - आमदार नमिताताई मुंदडा मोफत शिबीरात २५० जणांची नेत्र तपासणी व २४ रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या - अक्षय भुमकर यांची माहिती

 


अंबाजोगाई (वार्ताहर) :

शहरातील मंगळवार पेठ भागात आयोजित मोफत शिबीरात २५० रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच २४ रूग्णांवर उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालय, उदगीर येथे योग्य ते औषधोपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांनी जनसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन केले.


आमदार नमिताताई मुंदडा यांच्या वाढिवसानिमित्त युवक कार्यकर्ते अक्षय भुमकर यांच्या पुढाकाराने आणि उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णलय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मंगळवार पेठ भागात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी आमदार नमिताताई मुंदडा यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. नेत्रतपासणी शिबीरात डॉ.प्रज्ज्वल देशपांडे, डॉ.प्रतीक जाधव, टेक्निशियन अविनाश आघोर यांनी रूग्ण तपासणी केली. या शिबिराचा लाभ २५० नागरिकांनी घेतला. पैकी २४ रूग्णांवर उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालय, उदगीर येथे योग्य ते औषधोपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शिबिराचे उद्घाटन आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांनी केले. यावेळी बोलताना आ.मुंदडा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अक्षय भुमकर यांनी पहिल्यांदाच एवढा मोठा, दर्जेदार व लोकांना उपयोगी ठरेल असा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल भुमकर यांचे त्यांनी अभिनंदन केले. दिवंगत लोकनेत्या डॉ.सौ.विमलताई मुंदडा यांचा समाजसेवेचा वारसा आपण सर्वांच्या सहकार्य व मदतीने पुढे नेत आहोत. महायुती सरकारच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा आपणांस पोहोचवायची आहे. देशाचे महामहीम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, गृहमंत्री अमितभाई शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात तसेच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या सहकार्याने अंबाजोगाई शहरासह केज विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. असंख्य विकास कामे यातून मार्गी लागत आहेत. पूर्ण होत आहेत. अशावेळी अक्षय भुमकर यांच्या सारखे तरूण भाजपाच्या माध्यमातून लोकांना आवश्यक असलेले समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत याबद्दल आमदार नमिताताई मुंदडा यांनी समाधान व्यक्त केले. तर प्रास्ताविक करताना अक्षय भूमकर यांनी सांगितले की, यापूर्वी ही आपण मित्र मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन, ब्लँकेट वाटप, स्वाराती रूग्णालयात रूग्ण व नातेवाईकांना मदत करणे, गोर-गरीब कुटूंबांना स्वस्त धान्य मिळवून देणे, तहसील आणि नगरपरिषद कार्यालय येथे सर्वसामान्य नागरिकांची कामे करून देणे, प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, रस्ते, नाली, वीज पुरवठा यासाठी पाठपुरावा करणे कोविड काळात रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांना धान्य व मदत मिळवून देणे, मनोरूग्ण, बेघर लोकांना मदत करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्‍नांची सोडवणूक करणे, प्रसंगी आंदोलने करणे, सार्वजनिक प्रश्‍नांवर निवेदने देणे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, आरोग्य विषयक बाबींची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करणे, गो-हत्येच्या विरूद्ध सातत्याने आवज उठविणे, नागरिकांसाठीच्या योजना त्यांना मिळवून देणे, नवमतदार नोंदणी उपक्रम राबविणे, शहराच्या सार्वजनिक, पर्यटन व सांस्कृतिक बाबींकरीता पाठपुरावा करणे, अंबाजोगाई शहराचा सांस्कृतिक वारसा, जोपासण्यासाठी हिरीरीने सहभाग घेणे आदी लोकहिताची कामे केली आहेत. यापुढे ही आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते काकाजी व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वात कायम समाजसेवा करणार आहोत असे भुमकर यांनी सांगितले. तर यावेळी माजी नगराध्यक्ष महादु मस्के, माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम भाई, भाजपा केज विधानसभा प्रमुख ऍड.शरद इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंडित अण्णा जोगदंड, माजी उपनगाध्यक्ष सारंग पुजारी, माजी नगसेवक संजय गंभीरे, माजी नगरसेवक वाजेद खतीब, माजी नगसेवक प्रशांत आदनाक, गणेश देशमुख, उपसरपंच सुनील भाऊ मस्के, नांदे सर, बळीराम चोपणे, अनंत अरसुडे, शिरीष मुकडे, अमोल पवार, गोपाळ मस्के, गौरव लामतुरे, महेश अंबाड, मयुर रणखांब, राहुल कापसे,अमोल साखरे, सरपंच गणेश रूद्राक्ष, अजय राठोड, विष्णु जाधव, माऊली वैद्य, चंद्रकांत गुमटे, रमण सोनवळकर, गोविंद पिंपळे, गोविंद तापडिया, राजपाल सारडा, शाम सोमाणी, गौरव कामळे, श्रीनिवास पिंपळे, उमेश डोंगे, शैलेश स्वामी, अमोल विडेकर, अभिमन्यू वैष्णव, ऍड.अरविंद मोटेगावकर, पत्रकार अतुल जाधव, अतुल कसबे, स्वप्निल पंचभाई, ईश्वर कल्याणी, पप्पू आगळे, महेश तपके, जयपाल ठाकुर, विशाल भांगे, अर्शद सय्यद यांच्यासह स्थानिक नागरिक, महिला भगिणी व सहकारी व मित्रपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश मामा काळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार रमण सोनवळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय जनता पक्ष आणि अक्षय भुमकर मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments