नदीची स्वच्छता व जलसंवर्धन काळाची गरजजलमित्र सुखदेव फुलारी

 


नदीची स्वच्छता व जलसंवर्धन काळाची गरजजलमित्र सुखदेव फुलारी 

 प्रविण भिसे शेवगाव प्रतिनिधी 

शेवगाव: दि. ०४/०२/२०२४  नदी ही माता असून तिचे संवर्धन व स्वच्छता केली पाहिजे तसेच ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असे मत जलमित्र सुखदेव फुलारी यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले ते शेवगाव येथील न्यू आर्ट्स  महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित नदी संवर्धन व स्वच्छता प्रकल्प उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेत बोलत होते. आज महाविद्यालयात नदी संवर्धन व स्वच्छता प्रकल्प उपक्रमा अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जलमित्र तथा जलसंवर्धन समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य श्री सुखदेव फुलारी  उपस्थित होते. याचबरोबर कार्यक्रमासाठी दुसरे प्रमुख अतिथी म्हणून वडुले बुद्रुक गावचे सरपंच श्री भीमरावजी सागडे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे हे उपस्थित होते त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून आज जगात निर्माण झालेली पाण्याची दुर्भिक्षता यावर प्रकाश टाकून प्रत्येक स्वयंसेवकाने समाजामध्ये नदीची स्वच्छता व संवर्धन याविषयी जनजागृती केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थी स्वयंसेवकांनी वडूले बु. येथील नंदिनी नदीची स्वच्छता केली.  या उपक्रमामध्ये 200 स्वयंसेवकाने सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख अधिकारी  डॉ. संदीप मिरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ युवराज सुडके, डॉ. अनिता आढाव, प्रा अश्विनी गोरखे, प्रा. मिनाक्षी चक्रे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राजेश्वरी सरोदे हिने केले व कार्यक्रमाचे आभार प्रा. राम कोरडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments