पंडितभाऊ दाभाडे यांना भारतगौरव राष्ट्रप्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर


पुणे
 दि. 10. राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणात बहुजन जनता दलाच्या माध्यमातून उपेक्षित शोषित वंचित दलित अल्पसंख्यांक रचित जाती जमाती बहुजन व इतरही घटकांच्या व गोरगरीब दिव्यांग आणि शिव शाहू फुले डॉ.आंबेडकर यांचा विचार घेऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय हे तत्त्व घेऊन सेवाभावी वृत्तीने काम करीत असलेले बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना स्त्री पुरुष समानता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य वतीने २०२४ चा प्रतिष्ठेचा समजला जाणारा भारत राष्ट्रप्रेरणा गौरव राज्यस्तरीय बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना जाहीर झाला आहे.

 बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या कार्याची दखल घेऊन लेक लाडकी अभियान महाराष्ट्र च्या वतीने शुक्रवार दिनांक २९. मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वा मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार संघाचे लोकमान्य हॉल आझाद मैदान जवळ महापालिका मार्ग मुंबई येथे मा. जुई गडकरी मराठी अभिनेत्री. मा विजया कदम अभिनेत्री चारुशीला देशमुख ज्येष्ठ समाजसेविका मा स्वाती़ ओक  सौंदर्यतज्ञ मारूशाली मा वृशाली बुचडे महाराष्ट्र मिस मा संगीता वाघमारे समाजसेविका मोनिका जगताप प्रवर्तक लेक लाडकी अभियान म रा मा किशोरताई पेडणेकर माजी महापौर मुंबई ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई माजी खासदार कामगार नेते व आमदार भाई जगताप .अॕड मा निर्मला सावंत माजी महिला आयोग अध्यक्षा म.रा  मा अशोक धात्रक माजी आमदार मा अनिल थत्ते मराठी बिग बॉक्स व ज्येष्ठ पत्रकार या मान्यवरांच्या उपस्थितीत बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांना भारत गौरव राष्ट्र प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे तेव्हा या कार्यक्रमाला राज्यातील बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे बहुजन जनता दलाच्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे  कळविण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments