उत्तरेश्वर पिंपरी येथे महाशिवरात्री महोत्सवाला ५ मार्चपासून प्रारंभ.



केज/प्रतिनिध 

बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे महाशिवरात्री निमित्त दरवर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. विसाव्या शतकातील महान विभूती संत सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली उत्तरेश्वर पिंपरीकर यांनी सुरू केलेल्या महोत्सवाची सुरुवात ५ मार्चपासून होत आहे. या मध्ये पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ८ रुद्राभिषेक, ८ ते ९ विष्णुसहस्त्रनाम, ९ ते११ श्री राम रक्षा व हनुमान चालीसा, ११ ते १ गाथा भजन, ४ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ नंतर रात्री ८ ते ११ हरी किर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. या सप्ताहामध्ये पुढील महाराजांची किर्तन सेवा होणार आहे. ५ मार्च मंगळवार रोजी ह भ प वामन महाराज लातूर, ६ मार्च बुधवार काकासाहेब महाराज उंबरे वाणे वाडीकर, ७ मार्च गुरूवार पांडुरंग महाराज कोकाटे अंबाजोगाई, ८ मार्च शुक्रवार पांडुरंग महाराज तिडके, ९ मार्च शनिवार ह भ प अनंत महाराज बिडवे, १० मार्च रविवार हंसराज महाराज मिसाळ हरकी निमगाव, ११ मार्च सोमवार रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत गुरुवर्य तपोनिधी नारायण महाराज पिंपरीकर माऊली संस्थान पिंपरी यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर महाआरती व महाप्रसाद होईल तरी या महोत्सवाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments