लातूर प्रॉपर्टी सेल Instagram अकाउंट चे 1,00,000 एक लाख Followers पूर्ण

 

लातूर प्रॉपर्टी सेल Instagram अकाउंट चे 1,00,000 एक लाख Followers पूर्ण झाले.... 

लातूर : लातूर मध्ये लातूर प्रॉपर्टी सेल या यूट्यूब चॅनल ची सुरुवात बिल्डर राहूल भैय्या कराड यांनी 31 मार्च 2021 मध्ये केली... सर्व सामान्य माणसाकडून एक ही रुपया कमिशन न घेता फक्त 3 वर्षाच्या आता 1000 पेक्षा जास्त प्रॉपर्टी खरेदी व विक्री करून देत हजारो लोकांना मोफत मदत करत राहूल कराड हे नाव तीन वर्षाच्या आत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलं.... सर्व सामान्य माणसांना मोफत मदत करत असल्याने व लोकांचे लाखो रुपये कमिशन वाचत असल्याने हजारो लोक या यूट्यूब चॅनल ला सपोर्ट करू लागले तसेच या यूट्यूब चॅनलच्या इंस्टाग्राम अकाउंट ने फक्त आठ महिन्यांमध्ये एक लाख फॉलोवर्स सुद्धा पूर्ण केले.अमेरिकेत शिक्षण घेतलेले हे 29 वर्षाचे बिल्डर राहूल भैय्या कराड आज कराड ग्रुप व कराड ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शन चे मालक असून शून्यातून सर्वात जलद गतीने कोट्यावधी रुपये कमवणारे तरुण सुद्धा बनले आहेत.... हजारो युवांचा पाठिंबा.. लाखो लोकांचा सपोर्ट असल्याने हे नाव आज हजारो लोकांच्या चर्चेचा विषय बनले आहे.... आवाजात जादू, कामात प्रामाणिकपणा, लोकांना मोफत मदत करणारा स्वभाव, सुशिक्षित व चालाक बुद्धिमत्ता, मनमिळावू व्यक्तिमत्व, न थकता, न हारता काम करत राहणे, दिलेल्या शब्दांचे पालन करणे, लोकांच्या मदतीला सतत धावून जाणे अशा अनेक गोष्टी या व्यक्तीमध्ये असल्याने ही व्यक्ती आज महाराष्ट्रात जलद गतीने वर येत आहे.  यूट्यूब चैनल पासून सुरुवात करत रिअल इस्टेट मध्ये आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा तयार करत स्वतः च्या प्लॉटिंग सुरू केल्या, रो हाऊस, स्वतंत्र बंगलो तयार करणे व विकणे असे करत करत एक नामांकित बिल्डर बनण्याचा प्रवास यांनी एकट्याने कोणाच्या मदतीशिवाय पूर्ण केला. तसेच यांनी रियल इस्टेट मधील कमी वेळात सर्वात जास्त प्रॉपर्टी विक्री करण्याचे रेकॉर्ड सुद्धा आपल्या नावावर केले. हजारो मुलांना शिक्षणासाठी मदत सुद्धा आज हे करत आहे. तरुण पिढी या व्यक्ती कडे बघून व्यवसायाकडे वळताना आज दिसत आहे. लातूर प्रॉपर्टी सेल या Instagram अकाउंट चे 1,00,000 एक लाख Followers पूर्ण झाल्याबद्दल बिल्डर राहूल भैय्या कराड ( मालक - लातूर प्रॉपर्टी सेल व कराड ग्रुप ) यांचे खूप खूप अभिनंदन.





Post a Comment

0 Comments