भिवंडी येथे चालू असलेल्या जीपीएल स्पर्धेत युथ क्रिकेट अकॅडमी (ठाणे) संघाचा दणदणीत विजय



भिवंडी - अतिशय भव्यदिव्य स्वरूपात भिवंडी येथे खेळवली जाणाऱ्या  जीपीएल स्पर्धेमध्ये युथ क्रिकेट अकॅडमी ठाणे विरुद्ध आरआर एससीएफ झालेल्या सामन्यामध्ये आरआरएससीएफ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण  करण्याचा निर्णय घेतला. ३० षटकाच्या या क्रिकेट सामन्यामध्ये युथ क्रिकेट अकॅडमी ठाणे संघाने तीस षटकात २४५ धावा केल्या. युथ क्रिकेट अकॅडमी संघाचा फलंदाज अमित काटवी याने उत्कृष्ट फलंदाजी करत ८४ चेंडूत १०३ धावा फटकावल्या त्याला प्रसाद झोरे यांनी २९ चेंडू ४२ धावा करून उत्कृष्ट साथ दिली.आरआरएससीएफ संघाचा गोलंदाज राय देवने ६ षटकात ४७ धावा देत तीन गडी बाद केले. या संघाचा दुसरा गोलंदाज ध्रुव याने ६ षटकात ५१ धावा देऊन युथ क्रिकेट अकॅडमीचे २  फलंदाज बाद केले. नंतर फलंदाजी करताना आरआरएससीएफ संघाचा डाव १४६ धावात २२ षटकात आटोपला. युथ क्रिकेट अकॅडमी ठाणे विरुद्ध खेळताना आरआर एससीएफ संघाच्या प्रदेशने ६२ धावा तर तीर्थ कापसे यांनी १८ धावा केल्या. त्यावेळी गोलंदाजी करताना प्रसाद झोरेने  पाच षटकांमध्ये २६ धावा देत ३ गडी बाद केले. तर त्याला अमित काटवी,साहिल थोरात,सोमनाथ दगडे, या गोलंदाजांनी प्रत्येकी १ गडी बाद करत  सुंदर साथ दिली. ठाणे हा संघ ९९ धावांनी विजयी झाला. या सामन्यात खेळताना युथ क्रिकेट अकॅडमीचा १०३ धावा करणारा फलंदाज अमित काटवी हा सामनावीर ठरला. या सामन्याला भरपूर प्रेक्षकांची उपस्थिती लाभली.

Post a Comment

0 Comments