लातूर : प्रतिनिधी : अहमदपूर येथील दिवाणी न्यायालय क. स्तरावरील सहाय्यक अधिक्षक विठ्ठल बाबुराव कोयाडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप संमारंभाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी त्यांचा जिल्हा न्यायाधीश वडगावकर साहेब, सहदिवाणी न्यायाधीश न्यायाधीश साहेब साबळे साहेब, सहदिवाणी न्यायाधीश तोंडचिरे साहेब, गाडीवाले साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. पांडुरंग टोम्पे, शोभा पांडुरंग टोम्पे, माजी मुख्याध्यापक यशवंतराव कोयाडे, अहिल्यादेवी कॉप्युटर जॉबवर्क सेंटरचे संचाल गणेश कोयाडे, अमर कोयाडे, नरसिंग केशवे, किशोर केशवे तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. दिनांक 30.06.2023 रोजी नियतवयोमानानुसार श्री विठ्ठल बाबूराव कोयाडे, सहाय्यक अधिक्षक, दिवाणी न्यायालय क.स्तर, अहमदपूर या पदावरुन सेवानिवृत्त झाले त्यावेळी श्री वडगांवकर साहेब, जिल्हा न्यायाधीश, अहमदपूर, तसेच सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर सर्वश्री श्री.ए.जी.साबळे साहेब, श्री. एस.एस. तोंडचिरे साहेब व सौ. के.बी. गाडीवाले मॅडम, सह दिवाणी न्यायाधीश, अहमदपूर यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी न्यायालयीन कर्मचारी श्री कल्याण कोनाळे, अधिक्षक श्री एम.के.कलशेट्टी अप्पा, एफ.ए.सय्द, सहाय्यक अधिक्षक, श्री हातागळे एस.टी., वरिष्ठ लिपिक श्री औटी, बारुळे, शेटकार, सौ. मानवते, लघुलेखक पन्हाळे तसेच कनिष्ठ लिपिक सर्वश्री यु.जी.जाधव, श्री शेट्टे श्रीकांत, लोंढे, सौ.कुलकर्णी, येनावार बेलिफ श्री सिरसाठ, तात्या आदमाने, भोसले मॅडम तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments