भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नवीमुंबई प्रभारी पदी सुजाता चिंता यांची निवड



भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नवीमुंबई प्रभारी पदी सुजाता चिंता यांची निवड

पुणे (प्रतिनिधी) : 
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी अंतर्गत पक्ष कार्याच्या अनुषंगाने तसेच आगामी होऊ घातलेल्या निवडणुका व पक्ष संघटन, हाथ से हाथ जोडो अभियान यशस्वीतेच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी,युवकांचे प्रेरणास्थान राहुलजी गांधी,राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, एच के पटेल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,महिला काँग्रेस आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेताजी डिसूजा, यांच्या मार्गदर्शन नियोजना नुसार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस प्रदेशध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांनी पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हानिहाय प्रभारी सहप्रभारी पदाच्या नियुक्त्या दिनांक 21 मार्च 2023 रोजी जाहीर केल्या आहेत.

पुणे येथील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी सुजाताई चिंता यांच्या कार्याची पक्ष श्रेष्ठींनी दखल घेऊन नवी मुंबईच्या प्रभारीपदी तर कोल्हापूरच्या  सहप्रभारी  म्हणून सुजाता चिंता यांची नियुक्ती केली आहे. सुजाता चिंता यांनी या पुर्वी गोवा राज्याच्या निवडणुकीत निरीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. सुजाता चिंता यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments