अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोगाई तालुक्यातील15 गावातील महिला मंडळाच्या महिलांनी एकत्र येऊन एकमेकींना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. एकल महिला संघटना ही गेल्या 7 वर्षपासून मराठवाड्यातील 4 जिल्हे व 11 तालुक्यातील 19000 महिलांसोबत त्यांच्या अर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय या पातळीवर महिलांवर होणारी विषमता नष्ट करून समता प्रस्तापित करण्यासाठी व त्यांना या समाजात मान सन्मान मिळणे व त्या स्वतंत्र होण्यासाठी संविधानिक मूल्यांच्या आधारे काम करते .एकल महिला संघटनेच्या महिला म्हणतात की बहिणीने भावलाच नाही तर बहिणीने बहिणीला पण राखी बांधायला हवी का तर एक बहीण, मैत्रीण पण एकमेकींना मदत, रक्षण करते, आधार देते. अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा, धानोरा, देवळा, पाटोदा, सातेफळ, लोखंडी इ. गावातील लिडर महिलांनी एकत्र येऊन जे कित्येक वर्षांपासून, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढी परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे व दाखवून दिले की भाऊच नाही तर आम्ही पण एकमेकींच् रक्षण करू शकतोत व करतोत. हा सा खरं तर पुरुषसत्ताक व्यवस्थेला बळकट बनवणारा आहे त्याला छेद देण्याचा प्रयत्न एकल महिला संघटनेच्या महिलांनी केला आहे.


0 Comments