आता घरबसल्या शिका तबला वादन कला

 


आता घरबसल्या शिका  तबला वादन कला

 ( पुणे)- अभिजात भारतीय संगीत परंपरेतील जगभरातील लोकप्रिय वाद्य म्हणजे तबला. या वाद्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले ते आपल्या पुर्वजांनी, गुरुंनी. साथसंगत व त्या सोबतच सोलो वादनाचा ही दर्जा या वाद्याला मिळाला. पूर्वी गुरु शिष्य परंपरेने हि कला शिकवली जायची. आजही हि परंपरा कायम आहे. गुरु समोर बसुन तालीम घेणे रियाज करणे याला पर्याय नाहीच पण काळानुसार तंत्रज्ञान बदलले तशी शिकण्याची आणी शिकविण्याची पध्दती बदलत गेली. आज जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातुन घरी बसुन आपण ऑनलाइन पध्दतीने तबला वादन कला शिकू शकतो. युवा पिढीतील प्रसिद्ध तबला वादक अविनाश पाटील गेली अनेक वर्षापासुन ऑनलाईन पध्दतीने तबला शिक्षण देण्याचे काम करत आहेत. भारतातील विविध राज्यासह अमेरिका, कॅनडा, लंडन, जर्मनी, अबुधाबी, दुबई, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया या देशातील अनेक विद्यार्थी तबला वादन शिकत आहेत व या कलेचा आनंद घेत आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मिरज यांनी देखील आता जगभरातुन कोठूनही संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्षेस बसण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे तबला वादन कला शिकणे आणी परिक्षा देणे आता सोपे झाले आहे.अविनाश हे पं. प्रमोद पाटील व पं. उमेश मोघे यांचे शिष्य आहेत त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही पदवी प्रथम श्रेणीत तर पुणे विद्यापीठातुन एम ए तबला ही डिग्री प्रथम श्रेणी व  सुवर्णपदकासह प्राप्त केली आहे. पद्मविभूषण पंडीत राजन साजन मिश्रा यांच्यासह अनेक दिग्गज गायकांना साथसंगत केली आहे. सवाई गंधर्व महोत्सवासह देशातील अनेक महोत्सवात अनेक दिग्गजांना साथ केली आहे. भारतातील सर्व प्रमुख शहरांसह दुबई,अबुधाबी, नेदरलँड्स,जर्मनी,पोलंड,डेन्मार्क, स्वित्झर्लंड, स्कॉटलंड व लंडन या ठिकाणी सोलो वादन करून जगभरातील रसिकांची दाद मिळवली आहे. अधिक माहितीसाठी ८६९८५०३७०१ या क्रमांकावर संपर्क करावा.

Post a Comment

0 Comments