आवर्तन च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध गायक पंडित कृष्णेंद्र वाडीकर यांच्या गायनाची मैफल

 




आवर्तन च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध गायक पंडित कृष्णेंद्र वाडीकर यांच्या गायनाची मैफल 


      लातूर येथील आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने मागील 83 महिन्यांपासून अविरतपणे शास्त्रीय संगीताच्या संवर्धनासाठी अखंड स्वरयज्ञ सुरू आहे.

       पुढील महिन्यात या आवर्तन ला सात वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने धारवाड येथील किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडीत कृष्णेंद्र वाडीकर यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीचे आयोजन रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 6 :30 वाजता येथील अष्टविनायक मंदिराच्या गणेश हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे,त्याना तबला साथ प्रसिद्ध तबलावादक श्री हनुमंत फडतरे व संवादिनी साथ-संगत प्रसिद्ध संवादिनी वादक श्री सुरेश फडतरे हे करणार आहेत 

      या सातव्या वर्धापन दिनासाठी उद्घाटक म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह व अर्थ भारती नागरी पतसंस्थेचे संचालक श्री नितीन शेटे हे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका तसेच स्थायी समिती सदस्य मनपा लातूर च्या सौ श्वेता विक्रम लोंढे या उपस्थित राहणार आहेत.

        नवनवीन घराण्यांचे गायन , वादन व नृत्य रसिकांना संगीत शिकणाऱ्या संगीत साधकांना सहज ऐकावयास मिळावीत या उद्देशाने आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानने हा मागील 83 महिन्यांपासून अविरतपणे हा स्वर यज्ञ सुरु केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला कोणतेही मूल्य आकारले जात नाही विनामूल्य सर्व रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो

     आज पर्यंत भारतातील अनेक दिग्गज  कलावंतांनी  या रंगमंचावर आपली हजेरी लावली आहे. या संगीतसभे सोबतच  कलावंतांच्या मुलाखती विविध विषयांवर चर्चासत्रे असे विविध उपक्रम शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसारासाठी हे प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून अविरतपणे प्रयत्न करत आहे. येथील बाल व युवा नवोदित कलावंतांना रंगमंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने मागील काही महिन्यांपासून बाल संगीत सभेचेही आयोजन या प्रतिष्ठानच्या वतीने केले जाते आहे,

       रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या या सातव्या वर्धापन दिनानिमित्त 83 व्या मासिक संगीत 

मैफिली साठी आपण सर्व रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अभय शहा ,सचिव डॉक्टर रविराज पोरे ,श्री विशाल जाधव , डॉक्टर संदीप जगदाळे प्राध्यापक हरीसर्वोत्तम जोशी व आवर्तन प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी  केले आहे. 

Post a Comment

0 Comments