बाल कलावंतांनी गाजवले आवर्तन चे व्यासपीठ
लातूर : प्रतिनिधी -
सोमवार दि. 31 जाने. 2022 रोजी *82 वी आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठान आयोजित मासिक संगीत सभा* संपन्न झाली. विशेष म्हणजे ही *बाल संगीत सभा होती* या संगीत सभेमध्ये लातूर येथील *चि. वेदांत आडसकर व चि.ईशान जोशी* या दोन बालकलाकारांनी आपल्या बहारदार तबलावादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. लातूर मधील जेष्ठ गुरु ऋषितुल्य स्व. पं.शांतारामजी चिगरी यांचे पट्टशिष्य श्री.संजय सुवर्णकार हे लातूर मध्ये शारदा संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने तबल्याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन संगीत साधकांना करतात त्यांच्याच या दोन बाल शिष्यानी *82 वीआवर्तन मासिक संगीत सभा* गाजवली. आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय अभयजी शहा यांनी या दोन्ही बाल कलाकारांना प्रत्येकी 500 रु. बक्षीस देऊन प्रोत्साहित केले.
आजपर्यंत या मासिक संगीत सभेमध्ये अनेक दिग्गज कलावंतानी आपल्या गायन वादन व नृत्याने रसिकाना मंत्रमुग्ध केले आहे.
परंतु आज आपण लहान मुला मुलीं मधील गुणवत्ता पाहिली तर खुप मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि या पीढिचा कल पाहता शास्त्रीय संगीताकडे खुप आहे. गरज आहे ती फक्त त्यांना प्रोत्साहित करण्याची,
हीच गोष्ट लक्षात घेऊन *आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानने* या संगीत सभेत बालसंगीत सभेचे आयोजन केले.या पुढेही लातूर मधील गायन , वादन व नृत्य क्षेत्रातील बाल / युवा नवोदित कलाकाराना वारंवार आवर्तनचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून शास्त्रीय संगीताचे संवर्धन व त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी करण्यात येईल असे मत *आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.अभय शहा* यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास संगीत साधक पालक व अनेक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 Comments
अभिनंदन
ReplyDelete