युवासेना अंबाजोगाई तालुकाप्रमुख पदी अक्षय भुमकर यांची निवड



शिवसेनेची अंगीकृत युवासेनेच्या बीड जिल्ह्य़ातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना मधुन जाहिर करण्यात आल्या असून अंबाजोगाई च्या तालुकाप्रमुख पदी अक्षय भुमकर यांची निवड करण्यात आली असून गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे एकनिष्ठ कट्टर शिवसैनिक म्हणून सामाजिक राजकीय कार्य अक्षय भुमकर युवासेनेच्या माध्यमातून करत आहेत याच कार्याची दखल घेऊन वरिष्ठांकडून तालुकाप्रमुख पदावर काम करण्यास संधी अक्षय भुमकर यांना मिळाली आहे.या पुर्वी शहर समन्वयक,  शहरप्रमुख,  विधानसभा चिटणीस अशा अनेक पदांवर राहुन  युवासेनेच्या माध्यमातून अक्षय भुमकर यांनी आंदोलन, सामाजिक कार्य,  रक्तदान शिबीर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या पदांचा उपयोग केला असुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या 80% समाजकारण 20% राजकारण या मूलमंत्रावर चलुन अक्षय भुमकर यांनी पदाला साजेसे काम केल्या बद्दल तालुकाप्रमुख पदी वर्णी लागली असुन, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांनी  युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असुन या सोबत उप जिल्हाप्रमुख पदि विनोद पोखरकर, विधानसभा अधिकारी अभिमन्यू वैष्णव, तालुका समन्वयक समाधान पिसाळ, शहर प्रमुख आकाश सुरवसे व शहर समन्वयक बळीराम धनवडे यांच्या नियुक्या जाहीर झाल्या असुन तालुकाप्रमुख पदी निवड केल्या बद्दल युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई, बीड जिल्हा विस्तारक अंकितजी प्रभु, शिवसेना संपर्कप्रमुख आनंदजी जाधव साहेब, सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे साहेब, बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव,सर्व यांचे  अक्षय भुमकर यांनी आभार मानले असुन. या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव अक्षय भुमकर यांच्यावर होत आहेत.

Post a Comment

0 Comments