शेकापच्या 9ऑगस्ट क्रांतीदिनी बैलगाडी मोर्चात सामील व्हा- भाई मोहन गुंड

 

बीड ( प्रतिनिधी ):-

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट रोजी अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे.या बैलगाडी मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हा असे आव्हान भाई मोहन गुंड यांनी केले आहे. कोरोनाच्या काळात शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाच कर्जमाफीपिक कर्ज, महागाईने शेतकरी त्रस्त झाला आहे. झोपच सोंग घेतलेली शासकिय यत्रंणा,कामचुकार अधिकारी शेतकऱ्यांची पिळवणुक करत आहेत. शेतकर्यांची आडवनुक थांबावी या साठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. मागील वर्षी चा पिक विमा अजून वाटप नाही, कर्जमाफी मध्ये आनेक शेतकरी अजून आले नाहीत, 3 लाखांची घोषणा फसवी, बँका पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत, संजय गांधी श्रावण बाळाच्या पगारी दर महिन्याला होत नाहीत,आंबा साखर कारखान्याने ऊसाचे एक रक्कमी बिल शेतकऱ्यांना पूर्ण दिले नाही, गोरगरीब हमाली करणाऱ्या लोकांना कुठल्या योजनेचा लाभ नाही या सह खालील मागण्या घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आंबेजोगाई विभागीय कार्यालयावर 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11वाजता कॉमेड अण्णाभाऊ साठे चौक ते बस स्टॅड मार्गे उपविभागीय कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चातील मागण्या मागील वर्षाचा पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करा,  दिल्लीतील नव्याने पारीत केलेले कृर्षी कायदे तात्काळ रद्द करा,बँकेकडून शेतकऱ्याची पीक कर्जासाठी अडवणूक तात्काळ थांबवा, डिझेल पेट्रोल गॅस महागाई तात्काळ कमी करा, आंबासाखर सहकारी कारखाने चालु हागाम ऊस गाळापाची उर्वरीत रक्कम एक रकमी द्यावी, हमाली करणाऱ्या असंघटित कामगारांचा माथाडी कामगारांच्या योजनेचा लाभ द्या, अतिवृष्टी झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्याना नुकसान भरपाई द्या, आंबेजोगाई तालुक्यातील संजय गांधी निराधाराच मानधन प्रेतेकी महीण्याला वाटप करा, शेतकऱ्यांना 65 वर्षा पुढील दहा हजार रुपये महिना पेन्शन लागू करा,
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून थकित नसलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये द्या या मागण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा असे आव्हान शेकापचे युवा भाई मोहन गुंड,अॅड नारायण गोले, अॅड संग्राम तुपे दत्ता प्रभाळे अर्जुन सोनवणे भिमराव कुटे अमोल सावंत सुग्रीव लाखे अशोक रोडे प्रवीण खोडसे लहु सुळुके मंगेश देशमुख आनील कदम राजु शेख राम नवले महेश गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments