
औसा | प्रतिनिधी : नागरसोगा गावचे सुपुत्र सुभेदार मेजर प्रकाश घोडके नायक शशिकांत मेलगर व दापेगाव येथील सुबेदार नेताजी निंबाळकर हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. यांचा दिनांक 11 जुलै रोजी भव्य सत्कार करण्यात आला. ज्यामध्ये अभिमन्यू पवार यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती होती. तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोष आप्पा मुक्ता सुशीलदादा बाजपाई व दिगंबर माळी आदी उपस्थित होते. भारतीय माजी सैनिक संघटना लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष कॅप्टन गिरी, कॅप्टन सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी हजर होते. याबरोबरच गावच्या सरपंच सरोजा ताई सूर्यवंशी उपसरपंच बंडू मसलकर, सदस्य भास्कर सूर्यवंशी गुरुजी, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी फावडे गुरुजी, सोसायटीचे चेअरमन यशवंतराव शिंदे व गावातील तसेच पंचक्रोशीतील सन्माननीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. विशेष करून नेताजी निंबाळकर यांचे भाऊ तानाजी निंबाळकर सुद्धा माजी सैनिक आहेत व ज्ञानोबा अडसुळे गंगाराम आडसुळे यांनी पण पुण्याहून उपस्थिती लावली. दरम्यान सत्कार व स्वागत समारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे सदस्य दिपकराव चाबुकस्वार यांनी केले. प्रस्तावना मध्ये श्री दीपक चाबुकस्वार यांनी केले बोलतांना त्यांनी माजी सैनिकांच्या जीवनावर प्रशंसा केली. कॅप्टन बळीराम सूर्यवंशी यांनी सैनिकी जीवन कसे असते, कोठे ड्युटी करतात, कोणत्या कठीण परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागतो, याबद्दल सविस्तर माहिती दिली. व्यासपीठावर आमदार अभिमन्यू पवार, कॅप्टन गिरी, सुभेदार मेजर प्रकाश घोडके यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्था कॅप्टन कमलाकर सूर्यवंशी माजी सैनिक संघटना औसा तालुका अध्यक्ष तसेच गावचे सुपुत्र या नात्याने त्यांनी केली व आलेल्या पाहुण्यांचे व जमलेल्या मंडळीची आभार व्यक्त केले.
0 Comments