जिल्हा न्यायालय लातूर येथे कोव्हीड – 19 लसीकरण शिबीर संपन्न

 


लातूर | (प्रतिनिधी) : मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालय लातूर येथे मा. श्रीमती मंगला धोटे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय परिसरामध्ये कोव्हीड – 19 लसीकरणाचा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा केंद्र लातूर येथे दिनांक 09/07/2021 रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा न्यायाधीश श्री ए.व्ही.गुजराथी यांच्या हस्ते सदर लसीकरण शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सर्व न्यायाधीश वृंद विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. आर.डी.काळे, ॲड. सचिव बावगे, ॲड. कलशेट्टी, न्यायालयीन व्यवस्थापक श्री हरिष भोईटे, प्रबंधक सौ. जे.डी. चौधरी, प्रशासकीय अधिक्षक श्री.बी.बी.दळवे उपस्थित होते. सदर लसीकरण शिबीरामध्ये न्यायाधीश, विधिज्ञ व कर्मचारी यांना कोव्हीड – 19 ची प्रतिबंधक लस देण्यात आल्या व एकूण 404 पात्र लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. तसेच सदर शिबीरास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अधिक्षक ए.एस.देवडीकर व जिल्हा विधी सेवा समितीचे सर्व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. अशा प्रकारे जिल्हा न्यायालय लातूर येथे कोव्हीड – 19  लसीकरण शिबीर संपन्न झाले.

Post a Comment

0 Comments