संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा,तालुका व शहर कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर -जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांची माहिती


अंबाजोगाई (प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेड बीड पूर्वचे वतीने अंबाजोगाई,केज व परळी तालुक्यातील जिल्हा,तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी दिली आहे. अंबाजोगाई येथील शासकिय विश्रामगृहावर रविवार,दिनांक २७ जून रोजी जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांचे मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत संभाजी ब्रिगेड या चळवळीच्या पक्षासाठी श्रम,कौशल्य,वेळ,पैसा,बुद्धी यांचे पंचदान देवून वैचारिक संघटनेत सातत्याने कार्यरत राहून सामाजिक कामे करून जनतेसाठी अहोरात्र कार्यरत असणारे प्रा.सुहास माने(जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडी,बीड),गोपाळ काटे (जिल्हा उपाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,बीड),अभिषेक भिसे(जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी,बीड),दुर्गेश जाधव (जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड सोशल मिडीया विभाग,बीड),ॲड.सुरज शिंदे (कायदे विषयक सल्लागार संभाजी ब्रिगेड,बीड),रामराजे गलांडे (जिल्हा कोशाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,बीड),गजानन आंबाड (जिल्हा संघटक,संभाजी ब्रिगेड,बीड),कैलास चाळक (तालुकाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,केज),अर्जुन चाटे (तालुकाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी,अंबाजोगाई.),केशव टेहरे (शहराध्यक्ष,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी,अंबाजोगाई.),सचिन साखरे (तालुका कार्याध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,केज.),महावीर पटेकर (तालुका संघटक,संभाजी ब्रिगेड,केज.) आदींच्या सामाजिक कार्याची दखल घेवून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी सर्वानुमते अंबाजोगाई,केज व परळी तालुक्यातील जिल्हा,तालुका व शहर कार्यकारणीतील पदाधिकारी यांच्या निवडी करून संबंधितांना नियुक्तीपत्र दिले.प्रारंभी जिजाऊ वंदना,प्रतिमापूजन आणि उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले तर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी घोरपडे,सचिव प्रा.राम ढोबळे,ॲड.पी.जी.शिंदे,पालकर सर,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब धुमाळ,डॉ.वसंतराव उंबरे,अंगद गायकवाड,नारायण मुळे,बालासाहेब घोरपडे,अनिल कोळी,धायगुडे कालीदास,बापू इंगळे,धनंजय देशमुख आदींची उपस्थित होते.बैठकीचे सुञसंचालन अंगद गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार दुर्गेश जाधव यांनी मानले.या निवडीमुळे नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments