गेली 2 वर्ष झाली जणूं काही संकटाचा डोंगर कोसळला आहे आणि तो सावरता सावरेनासा झालाय..! देशावर आलेलं कोरोनाच महासंकट अजून पूर्णपणे संपले नाही तोपर्यंत अनेक वेगवेगळी संकटे येत आहेत. पर्यटन स्थळ पाहण्यासाठी गेलेल्या अनेकांचे अपघाती निधन झाले, तर कोणाचे स्ट्रेकींक साठी गेलेल्या दरी कोसळून मृत्यू झाले, तर कोरोना झालेल्या रुग्णांचा वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मरण पावले, बरेच लोकं जुन्या खूप वर्षपूर्वी च्या बिल्डिंग कोसळल्यामूळे झाले, तसेच काही जहाज, बोटी बुडल्यामुळे झाले आणि विमानात अपघाती निधन झाले. खरंच देवा किती हा संकटाचा डोंगर आणि कुठपर्यंत करावा आम्ही सामना....! ही संकटे संपली तोपर्यंत दुसरी संकटे येऊन टेकली. कधी निसर्ग पोट भरण्यासाठी साथ देतो तर कधी निसर्गच जीवावर बेततो. पीक येण्यासाठी वर बघावं लागत कधी पाऊस पडतो की म्हणून वाट पाहावी लागते तर कधी निसर्ग जीवावर येतो पाऊस जास्त पडतो आणि सगळीकडे पिकाची नासाडी होते .शेतकरी राजाचं आर्थिक नुकसान होतच त्याबरोबर मानसिकरित्या ही माणूस खचतो. परंतु यावर्षी झालेली हानी ही कशाने च भरून न येणारी आहे. कोल्हापूर, सांगली ,सातारा ,चिपळूण, रत्नागिरी इथे निसर्गाने अतिवृष्टी केली.महापूर आला आणि क्षणात होत्याच नव्हतं झालं. पाऊस इतका आला की सगळं दृश्य बदलून गेलं. अनेक लोक वाहून गेले तर अनेकांनी पाण्यात वाचवा वाचवा आवाज देत जीव सोडला.सगळ्यांचे संसार उध्वस्त झाले. कोणी उपाशी राहून मेले, दुकाने वाहून गेले. काही नि आपले चिमुकले गमावले तर काही वडील अशी अनेकांची घर बेघर झाली .कोणाच्या घराला कुलूप लागलं हे म्हणण्याची वेळ ही चुकीची ठरते कारण कोणाची घरच राहिली नाहीत. वाचणाऱ्या जीवाला वाट दिसू रे देवा म्हणण्याची वेळ आली. सगळीकडे पाणीच पाणी झाले. ररस्ते नाहीसे झाले. अगदी अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग.
" पाहता क्षणी डोळ्यात येतं पाणी
हाक कशी देऊ देवा
बंद पडत आहे माझी वाणी
किती रे हा आक्रोश
किंचाळ्या ही फोडल्या
कोणी धावल नाही मदतीला
वाट दिसू दे गा देवा
वाट दिसू दे...!
पाऊसाचा महापूर आला आणि स्वप्न बेघर झालं.जीवन म्हणजे जणू काही किडा मुंगी. सजीव माणस रगडली गेली. अनेकांनी जीव गमावले.परंतु ज्यांनी स्वतः वाचवलं अशा लोकांची परिस्थती खूप कठीण आहे.यांना ना अंगावर घालायला दुसरे कपडे आहेत ना जेवायला काही .ना घर ना घरात धान्य. मुख्यमंत्री तसेच अनेक ट्रस्ट हे मदतीला धावले.तसेच अनेक आमदार खासदार यांनी मदतीची हाक दिली.तसेच गरीब जनतेने सार्वजनिक निधी गोळा करून त्यांना पैसे पाठवले तर काहींनी धान्य स्वरूपात त्यांना मदत केली. जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या तर त्यानां घर बांधण्यासाठी निधी देखील सरकार देणार आहे.
- डॉ सुजाता फड (BAMS) sujataphad17@gmail.com

0 Comments